राहुल गांधींच्या मिमिक्री व्हिडिओवरून भाजपचा संताप...!!

Foto
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करणार्‍या एका व्हिडिओवरून भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसला लक्ष्य केले आहे. काँग्रेसने एक्सवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये एक व्यक्ती राहुल गांधींच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदींची नक्कल करताना दिसत आहे आणि राहुल गांधी या कृतीचा आनंद घेताना दिसत आहेत. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी हा व्हिडिओ रीपोस्ट करत काँग्रेसवर टीका केली.

इंदूरमध्ये राहुल गांधींच्या ङ्गछात्रों की गूंजफ (विद्यार्थ्यांचा आवाज) या कार्यक्रमात एका विनोदी कलाकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदींची हुबेहूब नक्कल केल्यावरून शनिवारी काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप झाले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित या कार्यक्रमात स्टँड-अप कॉमेडियन पुलकित मणी याने मंचावरून मोदींच्या देहबोलीची आणि परदेशी नेत्यांशी संवाद साधण्याच्या त्यांच्या शैलीची नक्कल केली होती. या सादरीकरणात मोदींचे परराष्ट्र धोरण, त्यांची आई आणि पंतप्रधानांनी मुलांसोबत केलेली नाण्यांची एक जादूची युक्ती यांचा संदर्भ होता.

याबाबत एक्सवरील एका पोस्टमध्ये किरेन रिजिजू यांनी म्हटले की, काँग्रेस पक्ष आता विनोदवीर आणि विदूषकांचा पक्ष बनला आहे आणि म्हणूनच त्यांना कायमचे बाजूला सारले गेले आहे. त्यांनी पुढे (शांती लाभो) असेही लिहिले. हा मिमिक्रीचा व्हिडिओ मध्य प्रदेशातील इंदूरमधील आहे, जिथे पंतप्रधान मोदींची थट्टा करण्यात आली. संबंधित बातमी 

वृद्ध महिलेचा अपमान केल्याचा आरोप
राहुल गांधींच्या मंचावर, मिमिक्री कलाकार पुलकित मणी याने पंतप्रधान मोदींची नक्कल करताना एका वृद्ध महिलेसाठी खुर्ची मागण्याच्या विनंतीची थट्टा केली. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी याला एका वृद्ध मातेचा अपमान म्हटले आहे. त्यांनी लिहिले, एकीकडे आदर आणि प्रेम; तर दुसरीकडे एका वृद्ध मातेची थट्टा. स्मृती इराणी काय म्हणाल्या

काँग्रेसचा तो व्हिडिओ पुन्हा शेअर करत माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लिहिले, जेव्हा एखाद्या व्यक्तीवर विनाश ओढवतो, तेव्हा त्याची बुद्धी सर्वात आधी नष्ट होते. याव्यतिरिक्त, भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी म्हटले की, राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते नसून ट्रॉल्सचे नेते आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही यावरून राहुल गांधींवर टीका केली आणि म्हटले की, राहुल गांधींच्या मंचावरून पंतप्रधान मोदींच्या दिवंगत मातेचा अपमान करण्यात आला.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही राहुल गांधींवर कडक शब्दांत टीका केली आणि नमूद केले की, राहुल गांधी अनेकदा अशा प्रकारे वागतात. त्यांनी टिप्पणी केली की, जर तो विद्यार्थ्यांचा कार्यक्रम असता, तर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधायला हवा होताप्रश्न विचारणे आणि उत्तरे देणे अपेक्षित होतेपरंतु पंतप्रधान मोदींची नक्कल करणे आणि अशा प्रकारे एका वृद्ध महिलेचा अपमान करणे चुकीचे आहे.
गजेंद्र शेखावत काय म्हणाले

दिल्ली भाजप नेत्या रेखा गुप्ता यांनी या घटनेला लज्जास्पद म्हटले आहे. एक्स () वरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, मातेचा अपमान होत असताना हसून राहुल गांधींनी आपले राजकीय संस्कार संपूर्ण देशाला दाखवून दिले आहेत. काँग्रेसचा हा राजपुत्र मानसिक दिवाळखोरीचा बळी ठरला आहे. त्यांनी टिप्पणी केली की, राजकारणात विरोध, वैचारिक मतभेद आणि अगदी तीक्ष्ण टीका असू शकते, परंतु एखाद्याच्या दिवंगत मातेबद्दल असभ्य टिप्पणी करणे आणि त्यांची थट्टा करणे हे राजकारण भारतीय समाज कधीही स्वीकारू शकत नाही. पंतप्रधान मोदींची नक्कल करणार्‍या व्हिडिओबाबत केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांनीही एक्सवर प्रतिक्रिया दिली आणि म्हटले, आडनाव चोरता येते, पण संस्कार नाही.